Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजराज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या शंभरपार; पुणे महानगरपालिकेकडून गरीब रुग्णांना आर्थिक...

राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या शंभरपार; पुणे महानगरपालिकेकडून गरीब रुग्णांना आर्थिक मदत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. आता रुग्ण संख्या १०१ वर पोहोचली आहे. १५ ते १६ रुग्ण गंभीर आहेत. तर आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून २५ हजारांपेक्षा जास्त घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पुण्यामध्ये याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर सोलापूरमध्ये एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. आता रुग्ण संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून रुग्ण आढळून आलेल्या भागाचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच ‘जीबीएस’ची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथके घेत आहेत.

अधिक माहिती अशी की, गुइलेन बॅरे सिंड्रोमला प्रतिबंधित करण्यासाठी आरोग्य विभागाने तात्काळ प्रतिसाद पथक स्थापन केले आहे. हे पथक रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांची पाहणी करत आहे. पुणे शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली असून, त्यातील निम्मे रुग्ण गंभीर असल्याचे असे समोर आले असून त्यांच्यावर आय सी यु मध्ये उपचार सुरू आहेत. याचा उपचार खर्च अधिक असल्याचे सांगितले जात आहे. पुणे महानगरपालिका गरीब रुग्णांच्या खर्चास मदत करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments