इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यातील काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आजचे हवामान आणि तापमान स्थिती जाणून घेऊ..
पश्चिम महाराष्ट्रात आज सर्वत्र कोरडे वातावरण असून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 2 दिवसांत पुण्यातील तापमानात घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
धुलिवंदनला राज्यातील विदर्भासह काही भागात उष्णतेची लाट असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच चढला असून सोलापुरात 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालीये. येत्या 2 दिवसांत तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
साताऱ्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी आज निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील तापमानात पुढील 24 तासांत काहीशी घट होण्याचा अंदाज आहे.