Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजराज्यातील महानिर्मिती महावितरण आणि महापारेषणः या वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांसाठी...

राज्यातील महानिर्मिती महावितरण आणि महापारेषणः या वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

राज्यातील महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांसाठी मंगळवारी बेमुदत संप सुरू करण्यात आले.

राज्यातील तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या कंत्राट दाराकडून होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासाठी कंत्राटी विरहित रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसह कामगारांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती तर्फे राज्यातील सुमारे 42 हजार वीज कंत्राटी कामगारांचा काल रात्री बारा वाजल्यापासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. पुण्यातील रास्ता पेठ येथील विद्युत पारेषण वितरण कंपनी समोर आंदोलन करून बेमुदत संप पुकारण्यात आला.

राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावे त्यांच्या विविध मागण्यांची दखल घेऊन त्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा या वीज कंत्राटी कामगारांनी व्यक्त केली. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सुमारे 42 हजार कंत्राटी कामगार रात्रीपासून हे आंदोलनात सामील झाले आहेत.

प्रशासन जर या मागण्यांकडे कानाडोळा करत असेल तर हे कंत्राटी कामगारांसाठी बेमुदत आंदोलन पुढे सुरू राहणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कंत्राटी कामगारांच्या मागण्या संदर्भात लवकर विचार करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य संघटक सचिन मेंगाळे उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments