इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प आज (10 मार्च) सादरहोणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी दोन वाजता विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करतील. अजित पवार हे 11 व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे एका बाजूला आर्थिक शिस्त आणि दुसऱ्या बाजूला लोकानुनयी घोषणा यामध्ये अर्थमंत्री अजित पवार कसा समतोल साधणार हे पहावे लागणार आहे.
आज सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार असल्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या कोणत्या घोषणा होतात हे पहावे लागणार आहे. मागील अर्थसंकल्पत लोकानुनयी घोषणा करण्यात आल्या होत्या. त्याचा भार सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर पडलेला दिसून येत आहे.
सरकार महसूल वाढीसाठी मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, मद्य, इंधन यावरील कर वाढवण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी सरकारकडून लोकप्रिय घोषणा करणे कठीण आहे. सरकारी तिजोरीवर भार टाकणाऱ्या नव्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्याची शक्यता कमी आहे.