Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजराजेश वर्मा यांनी स्वीकारला पुणे रेल्वे विभागाचा पदभार

राजेश वर्मा यांनी स्वीकारला पुणे रेल्वे विभागाचा पदभार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) पदाचा पदभार राजेश कुमार वर्मा यांनी इंदू दुबे यांच्याकडून स्वीकारला. रेल्वे सुरक्षा वाढवणे, वक्तशीरपणा सुधारणे, महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे या गोष्टींवर भर राहणार असल्याचे वर्मा यांनी पदभार घेतल्यानंतर स्पष्ट केले. पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदू दुबे यांची बदली करून त्यांच्या जागी राजेश कुमार यांच्या नियुक्तीचे आदेश मध्य रेल्वेने काढले होते.

यापूर्वी कुमार यांनी उत्तर रेल्वेमध्ये मुख्य सामग्री व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. तसेच, वर्मा यांनी भारतीय रेल्वेमध्ये उत्तर रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि उत्तर पूर्व रेल्वे, रेल कोच फॅक्टरी उत्पादन युनिट्स अशा विभागात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. पुणे रेल्वे विभागात काम करताना आधुनिक भारतीय रेल्वेच्या दृष्टिकोनानुसार प्रवाशांचा चांगली सेवा देण्यास प्राधान्यक्रम निश्चित केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments