Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजराजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले...

राजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे. 288 पैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कायम रहावं, अशी इच्छा त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी नोंदवलं आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, सूत्रानुसार देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले असून कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. अमित शाहा यांच्या उपस्थितीमध्येच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच 26 नोव्हेंबर 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या 14 व्या विधानसभेची मुदत आज (दि. 26 नोव्हेंबर) संपणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होऊन शपथविधी होणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments