इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड | 31 ऑक्टोंबर 2023 मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्याच्याशी काय चर्चा झाली, ही माहिती त्यांनी या चर्चेत दिली. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, आपण पूर्ण आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी राजीनामे देणाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी खडे बोल सुनावले. काही दिवसांसाठी राजीनामे देण्यापेक्षा दबाब गट तयार करावे, मुंबईतच थांबून सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यास भाग पाडावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. बंद करू नका. थोडं थांबा. लगेच निर्णय घेऊ नका, असे त्यांनी समाजातील तरुणांना सांगितले.
राजीनामा देण्यास सांगितले नव्हते
मराठा समाजातील राज्यातील आमदार मुंबईकडे गेले आहेत. त्यांचे योगदान मराठा समाज विसरणार नाही. काही आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा का दिला आहे, हे माहीत नाही. त्यांना आम्ही राजीनामा देण्यास सांगितले नव्हते. त्यांच्या राजीनामा दिल्यामुळे मराठा समाजास काय फायदा होणार आहे आणि काय तोटा होईल, हे माहीत नाही. आमदारकी किंवा खासदारकी असेल तर ते सरकारवर दबाब तरी आणू शकतील. परंतु राजीनामे दिले तर ते रिकामे बसतील. आम्हीही रिकामे आणि तेही रिकामे आत बोलायला कोणी तरी पाहिजे. हे फक्त तुटूनच पडले आहेत.
आरक्षण घेतल्याशिवाय थांबू नका
तुम्हाला योग्य वाटत असेल तर द्या राजीनामा. परंतु १० ते १५ दिवसांसाठी राजीनामा दिला तर ठीक आहे. राजीनामा देण्यापेक्षा सर्व आमदार आणि खासदारांनी मुंबईतच थांबावे. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या सदऱ्याला धरून बसावे. आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी गट तयार करावा. मुंबई सोडू नका. आरक्षण घेतल्याशिवाय थांबवू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे दार सोडू नका. त्यांच्या पाया पडा. आरक्षण मिळवून घ्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
बंद करु नका
मराठा आरक्षणासाठी बंद पुकारण्याच्या हालचाली सुरु आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, बंद करू नका. थोडे थांबा. लगेच निर्णय घेऊ नका. आपण संयम ठेवू. पण शेवटी समाजाचा निर्णय आहे. त्यापलिकडे मी जाऊ शकत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले