Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज रागात बघत असल्याचा जाब विचारलाः तर टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला; सहकारनगर पोलिस...

रागात बघत असल्याचा जाब विचारलाः तर टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला; सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रागात बघत असल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने एका अल्पवयीन तरुणाला कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना संभाजीनगर धनकवडी येथे घडली.

याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विक्की कांबळे (वय २४, शंकर महाराज वसाहत, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्याचा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते. त्यावेळी एक अल्पवयीन आरोपीने त्यांचा रस्ता असून रागाने बघत होता. फिर्यादिच्या मित्राने आरोपीला रागाने का बघत आहे असे विचारले होते. त्यावेळी शाब्दिक वाद होऊन मिटला. यानंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादी हे पताका लावत असतांना आरोपी आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी कोयत्याने वार करून जखमी केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही पठारे करत आहेत.

पाया पडण्याच्या बहाणाने तरूणाला लुटले

पायी चाललेल्या तरूणाच्या पाया पडण्याचा प्रयत्न करीत चोरट्यांनी त्याच्याकडील १८ हजारांची रोकड असलेले पैशांचे पाकीट चोरून नेले. ही घटना मध्यवर्ती गजबजलेल्या फर्ग्युसन रस्त्यावरील ओरलिया कापड दुकानासमोर घडली आहे. याप्रकरणी नौमान पठाण (वय २८, रा. गोखलेनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नौमान हे फर्ग्युसन रस्त्यावरील ओरलिया दुकानासमोरून पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांपैकीएकजण खाली उतरला. त्याने नौमानच्या पाया पडण्याचा बहाणा केला, त्याचवेळी दुसऱ्या चोरट्याने नोमानच्या मागील खिशात असलेले पैशांचे पाकीट चोरून नेले. पाकिटात १८ हजारांची रोकड होती. पोलीस अमलदार एस शिरसाठ पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments