Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजरांजणगावातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

रांजणगावातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील चौक परिसरातएक इसम नागरिकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली. त्यांनतर पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन छापा टाकला असता त्यांना फिरोज तांबोळी हा इसम नागरिकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याला जुगाराच्या साहित्य व रोख रकमेसह ताब्यात घेतले.

याबाबत पोलीस शिपाई उमेश महादेव कुतवळ (रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी फिरोज रज्जाक तांबोळी (वय ३१ रा. मारुती मंदिर जवळ रांजणगावं गणपती ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments