Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज रवीना टंडनची मुलगी 20 वर्षांनी मोठ्या सुपरस्टारसोबत करणार रोमान्स

रवीना टंडनची मुलगी 20 वर्षांनी मोठ्या सुपरस्टारसोबत करणार रोमान्स

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीतील नवीन स्टार किड्स चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा यांच्यासोबतच अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच फिल्म इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवणार आहे. राशाने नुकतंच तिचं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ती 18 वर्षांची आहे. आई रवीनाप्रमाणेच तिचंही चित्रपटसृष्टीत काम करण्याचं स्वप्न आहे. यासाठी राशाला करिअरमधील सर्वात पहिली • ऑफरसुद्धा मिळाली आहे. ती लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटात ती ज्या अभिनेत्यासोबत काम करणार आहे, तो तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे.

रिपोर्ट्सनुसार, ती RRR फेम अभिनेता रामचरणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा एक तेलुगू चित्रपट असेल. यासाठी राशाने ऑडिशन्स दिले असून चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाली आहे. त्यामुळे 18 वर्षीय राशा आता 38 वर्षीय रामचरणसोबत काम करताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा बजेट 300 कोटी रुपये इतका आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक बुच्ची बाबू सना याचं दिग्दर्शन करणार आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा असेल. राशा आणि रामचरणच्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.

राशा या वर्षी 16 मार्च रोजी 17 वर्षांची झाली. बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सप्रमाणेच तिने मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. 2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशाला जन्म दिला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. राशा तिच्या लूक आणि सौंदर्यामुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. बॉलिवूड पदार्पणापूर्वीच इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिचे इन्स्टाग्रामवर सात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments