Tuesday, December 3, 2024
HomeUncategorizedरपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा झाला पसार

रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा झाला पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडील बुलेट चोरून चोरटा पसार झाल्याची घटना कोंढवा भागात घडली. खरेदीचा बहाणा करून पसार झालेल्या तरुणाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रसंगी अल्तमश जरीफ शेख (वय २७, रा. रामटेकडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, शेख हे उंड्री भागातील जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे कामाला आहेत. २६ ऑक्टोबर रोजी ते दुकानात थांबले होते. त्यावेळी एक तरुण दुचाकी खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. त्याने दुचाकींची पाहणी केली. दुकानात असलेली बुलेट त्याला पसंत पडली. शेख याला तरुणाने विश्वासात घेतले. बुलेटवर रपेट मारून येतो, असे त्याने त्यांना सांगितले. त्यानंतर तो बुलेट घेऊन रपेट मारण्यासाठी बाहेर पडला. बुलेट घेऊन पसार झालेला तरुण न परतल्याने शेख यांना संशय आला. ते त्याची वाट पाहत थांबले. त्यांनी तरुणाचा शोध घेतला.

बुलेट घेऊन तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मालकाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोंढवा पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या बुलेट चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments