Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजरक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड; खासदार सुप्रिया सुळे पोस्ट करत म्हणाल्या..

रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड; खासदार सुप्रिया सुळे पोस्ट करत म्हणाल्या..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची व तिच्या मैत्रिणींची शुक्रवारी मुक्ताई नगर भागात छेड काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला ताब्यातही घेण्यात आलं आहे तर इतर आरोपी फरार आहेत. आता या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट लिहित सरकारला धारेवर धरलं आहे.

सुप्रिया सुळे पोस्ट लिहीत ‘काय’ म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “केंद्रीय मंत्री व भाजपाच्या नेत्या रक्षाताई खडसे यांच्या कन्येची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक बाब आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची किती दुर्दशा झालीय हे या घटनेतून स्पष्ट होतंय. या राज्यात राहणारी प्रत्येक मुलगी सर्वप्रथम महाराष्ट्राची लेक आहे. तिच्या सन्मानाचं रक्षण करणं हे महाराष्ट्र शासनाचं आद्यकर्तव्य आहे. एक आई म्हणून मी रक्षाताईंना झालेल्या वेदना समजू शकते. याप्रसंगी मी त्यांच्यासोबत उभी आहे. राज्यातील मुलींची छेड काढणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन महिला सुरक्षेच्या संदर्भाने महाराष्ट्राला आश्वस्त करावे”. अशा आशयाची पोस्ट सुप्रिया सुळेंनी एक्स या मध्यमावर करत सरकारला जाब विचारला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments