Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजयेरवडा येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

येरवडा येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत : विभागीय क्रीडा संकुल समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाच्यावतीने व कैवल्यधाम आऊटरिच या संस्थेच्या सहकार्याने येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुल येथे १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

योग दिनाच्या कार्यक्रमात उपसंचालक युवराज नाईक, तहसिलदार दिलीप आखडे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सहायक समाजकल्याण आयुक्त मल्लिनाथ हरसुरे याच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, येरवडा येथील गेनबा मोझे शाळेतील विद्यार्थी आदींनी सहभाग घेतला.

याचबरोबर जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुल, बारामती, तालुका क्रीडा संकुल मंचर, इंदापूर व खेड, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा व जिल्ह्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानीत शाळा, महाविद्यालयात योगदिनाचे आयोजन करण्यात आले. योग दिनाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण २ लाख ८३ हजार नागरिक, अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments