Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजयेरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला कुत्र्याने लचके तोडलेला अर्धवट मृतदेह

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला कुत्र्याने लचके तोडलेला अर्धवट मृतदेह

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुंजन जवळ असणारे न्याती बिल्डिंग समोरील झाडाझुडपात बेवारस अर्धवट मृतदेह आज (दि.07 नोव्हेंबर) 08.45 वा सुमारास आढळला आहे. नियंत्रण कक्षाकडून याबाबत माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणाता पुढील तपास येरवडा पोलीस करत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केले असता, एक सडलेल्या अवस्थेत असलेला बेवारस अर्धवट मृतदेह दिसून आला. अंदाजे हा मृतदेह गेले 8-10 दिवस त्या ठिकाणी असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. सदर मृतदेह डिकंपोज अवस्थेत आहे. सदर बेवारस मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला असून मृत व्यक्तीचा बराचसा भाग कुत्र्याने खाल्लेला दिसून येत आहे. मृत व्यक्तीचा कमरेपासून खालील भाग थोडा शिल्लक असून कवटी व वरील भाग पूर्णपणे कुत्र्याने खाल्लेला आहे.

सदर मृतदेह बेवारस व्यक्तीचा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, सदर भागामध्ये बरेच फिरस्ती बेगर लोक झोपत असतात. तरी सद्यस्थितीमध्ये संशयास्पद असे काही आढळून आलेली नाही. तरी याप्रकरणाता पुढील तपास येरवडा पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments