Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजयेरवडा कारागृहात बंद्याकडून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाणः चौघा बंदीवानांनी Iघातला विनाकारण...

येरवडा कारागृहात बंद्याकडून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाणः चौघा बंदीवानांनी Iघातला विनाकारण वाद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

येरवडा कारागृहातील सी. जे. विभागात नवीन गेटजवळ दगडी बांधकाम करण्यात येत होते. त्यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंदीवानांना दूर करणाऱ्या सुरक्षा रक्षकासोबत चौघा बंदीवानांनी वाद घालून त्यांना बेदम मारहाण करीत जखमी केले.

अपुर्व संजय खंडागळे, सूरज नारायण आडागळे, आनंद उर्फ सोनू सिद्धेश्वर धड, नीरज लक्ष्मण ढवळे (सर्व बंदीवान येरवडा कारागृह) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बंदीवानांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार नानासाहेब मारणे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार नानासाहेब मारणे येरवडा मध्यवर्ती कारागृहात ड्युटीला असून, ६ मे रोजी ते सकाळी सी. जे. विभागात कर्तव्यावर होते. त्याठिकाणी सिस्टीम बसविण्यासाठी भिंत पाडून नवीन बांधकाम करण्यात येत होते. परिसरातील दगड, गोटे खाली पडून बंदीवान जखमी होण्याची शक्यता होती. त्यामुळे मारणे हे त्याठिकाणी येणाऱ्या बंदीवानांना मज्जाव करीत होते. त्यावेळी चौघा बंदीवानांना मारणेंचा राग आला. त्यानंतर त्यांनी मारणेंच्या हातातील लाठी हिसकावून घेत त्यांना मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करीत आहेत.

घरफोडी करून सव्वा लाखाचे दागिने चोरले

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वा लाख रूपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना ४ ते ६ मे रोजी घडली आहे. याप्रकरणी संजय रायकर (वय ४९, रा. फुलेनगर, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हे कुटूंबियासह लोणी काळभोरमधील फुलेनगरमध्ये राहायला आहेत. ४ ते ६ मे रोजी कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील १ लाख १८ हजारांचे दागिने चोरून नेले. गावाहून आल्यानंतर संजयला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments