Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजयेरवडा कारागृहातील मारहाणीचा खून करून सराईत गुन्हेगारांनी घेतला बदला: हॉटेलमधील त्या खुनाचा...

येरवडा कारागृहातील मारहाणीचा खून करून सराईत गुन्हेगारांनी घेतला बदला: हॉटेलमधील त्या खुनाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून उलगडा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे सोलापूर रस्त्यावरील इंदापूर शहरास लागून असलेल्या बायपास महामार्गावर हॉटेल जगदंबा या ठिकाणी 16 मार्च रोजी सराईत गुन्हेगार अविनाश बाळू धनवे (वय -31) राहणार -वडमुखवाडी, तालुका-हवेली व त्याचे तीन मित्र जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी जेवणाची ऑर्डर देऊन चार मित्र टेबलवर बसलेले असताना, आठ जणांच्या टोळक्याने हातात पिस्टल, कोयता घेऊन येऊन, हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाश धनवे यांच्यावर पिस्टल मधून फायर करून कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला.

या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना कोल्हापूरकडे पळून जात असताना, शिंदेवाडी गावाच्या परिसरातून ताब्यात घेतले आहे. येरवडा कारागृहामध्ये असताना मयत अविनाश धनवे याने दोन आरोपींना मारहाण केली होती. सदर मारहाणीचा बदला आणि टोळीच्या वर्चस्वाच्या वादातून सदर खून करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

याप्रकरणी शिवाजी बाबुराव भेंडेकर (वय-35), मयूर उर्फ बाळ मुकेश पाटोळे (वय-20), सतीश उपेंद्र पांडे (वय- 20), सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय-22, सर्व आरोपी राहणार -आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे) यांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी आरोपीं विरोधात मयत अविनाश धनवे याची पत्नी पूजा धन्वी हिने फिर्याद दाखल केली आहे. सदर फिर्यादीनुसार अविनाश धनवे याचा मित्र बंटी उर्फ प्रणील मोहन काकडे हा सराईत गुन्हेगार फुटीर होऊन त्याने धनवे हा पंढरपूरला जात असल्याची माहिती आरोपींना दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न सारखे सहा गंभीर गुन्हे दाखल होते. मोका गुन्ह्यांमध्ये चार वर्षे तो येरवडा कारागृहामध्ये होता.

7 फेब्रुवारी 2024 ला तो कारागृहामधून जामिनावर बाहेर आला होता. तसेच शिवाजी भेंडेकर हा आरोपी 2012 मध्ये गजानन नावगिरी आणि पिन्या उर्फ गंगाधर गडदे या दोघांच्या डबल मर्डरच्या गुन्ह्यात दहा वर्षे कारागृहात होता. यादरम्यान, येरवडा कारागृहात अविनाश धनवे याने शिवाजी भेंडेकर आणि मयूर पाटोळे या दोन आरोपींना वर्चस्वचे वादातून मारहाण केली होती. त्यामुळे त्याचा बदला घेण्याचे आरोपींनी निश्चित केले होते. तसेच अविनाश धनवे हा आळंदी परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याची सदर भागात गुन्हेगारी दहशत होती. आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळी सोबत त्याचे पूर्व वैमनस्य होते. या वर्चस्वचा वादातूनच त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments