Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज युद्धात इस्रायलसाठी 'सॅपर्स इंजिनिअर्स पलटवणार बाजी, कोण आहेत हे ?

युद्धात इस्रायलसाठी ‘सॅपर्स इंजिनिअर्स पलटवणार बाजी, कोण आहेत हे ?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जेरुसलेम : इस्रायली सैन्य एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढत आहे. पण खऱ्या युद्धाला आता सुरुवात होईल. युद्धाच काऊंटडाऊन सुरु झालं आहे. कुठल्याही क्षणी युद्धाची घोषणा होऊ शकते. इस्रायलचे हजारो सैनिक गाझा पट्टीजवळ उभे आहेत. फक्त आक्रमण या घोषणेची त्यांना प्रतिक्षा आहे. त्यानंतर गाझाच्या छोट्या, रुंद गल्ल्यांमध्ये भीषण युद्धाला सुरुवात होईल. इस्रायली सैन्य कुठल्याही • क्षणी गाझा पट्टीत घुसू शकतं. फक्त पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. गाझा पट्टीजवळ 10 हजारपेक्षा जास्त सैनिकांनी तळ ठोकला आहे. रणगाडे आणि रॉकेट लॉन्चर प्रकोप करण्यासाठी तयार आहेत. 2006 नंतर इस्रायली सैन्य पुन्हा एकदा मोठ जमिनी युद्ध लढणार आहे. हमासला मिटवून टाकण्यासाठी समुद्र, जमीन आणि हवेतून प्रहार करण्याची रणनिती आहे.

इस्रायली सैन्य अर्बन वॉर फेयर म्हणजे रहिवाशी भागात युद्ध लढण्यात पारंगत आहे. सध्या ग्राऊंड ऑपरेशनची फुल प्रूफ तयारी करण्यात आलीय. जेणेकरुन इस्रायली सैन्याच कमीत कमी नुकसान होईल. हमासला पूर्णपणे संपवण्याचा चंग इस्रायलयने केलाय. यशस्वी ऑपरेशनसाठी इस्रायली सैन्याला जमिनीवरच्या युद्धाची स्पेशल ट्रेनिंग देण्यात आलीय. जवानांना हमासचे दहशतवादी दिसताच, गोळ्या मारण्याची सूट आहे. इस्रायलकडून जमिनीवरच्या युद्धात कोण-कोण लढणार? ते समजून घ्या.

सॅपर्स इंजिनिअर्स काय करणार?

इन्फैन्ट्री फोर्स, कमांडो, सॅपर्स ग्राऊंड ऑपरेशनची अमलबजावणी करतील. सॅपर्स इंजिनिअर्स या युद्धात महत्वाची भूमिका बजावतील. त्यांच्यावर बरच काही अवलंबून असेल. सॅपर्स इंजिनिअर्स इस्रायलच्या विजयाचा पाया रचतील. सॅपर्स इंजिनिअर्सवर भू-सुरुंग हटवण्याची जबाबदारी असते. गरज पडल्यास सॅपर्स इंजिनिअर्स पूल, इमारत, भिंत आणि टनेल उद्धवस्त करतील. गाझा पट्टीत अरुंद रस्ते आणि छोट्या-छोट्या गल्ल्या आहेत. अशावेळी सॅपर्स इंजिनिअर्सची भूमिका महत्त्वाची असेल.

गाझा जिंकल्यानंतर काय करणार?

जमिनीवर युद्ध लढणाऱ्या सैन्याला इस्रायली एअरफोर्स आकाशातून कव्हर देईल. इस्रायली एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर आणि ड्रोन जमिनीवरील सैन्याला सुरक्षा देतील. बॉर्डर तसेच समुद्रातून आर्टिलरी आणि रॉकेट लॉन्चरने हल्ला करण्याची तयारी आहे. गाझा जिंकल्यानंतर काय करायच त्याचा प्लान सुद्धा तयार आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments