Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजयशोगाथा..! जिद्द अन् परिश्रमातून थोरात कुटुंबातील दोन्ही भावंडे अधिकारी पदावर

यशोगाथा..! जिद्द अन् परिश्रमातून थोरात कुटुंबातील दोन्ही भावंडे अधिकारी पदावर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

केडगाव (पुणे): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने मार्च 2025मध्ये घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश (प्रथम वर्ग) सुपर क्लास वन पदी कु. स्नेहा संगीता गोरक्षनाथ थोरात यांची निवड झाली आहे. थोरात परिवाराचा स्पर्धा परीक्षा शेत्रात खूप मोठा दबदबा निर्माण झाला आहे. याच कुटंबतील अनिकेत थोरात यांनी पहिल्याच प्रयत्नात नायब तहसिलदार, तसेच दुसऱ्या प्रयत्नात कामगार आयुक्त पदी मानाचा तुरा रोवला आहे.

अनिकेत यांची सध्या नांदेड जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. त्यांचीच प्रेरणा व मार्गदर्शन कु. स्नेहा थोरात यांना लाभले आहे. स्नेहा यांनी दहावी मध्ये 96 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर साधना स्कूल येथे बारावी तर पुढील पाच वर्षे B.A.L.LB साठी पुणे येथे शिक्षण घेतले. स्नेहा यांनी लहान पानापासून भारतीय राज्यघटनेची व कायद्याच्या शेत्रामध्ये करिअर करण्याची प्रबळ इच्छाशक्ती मनाशी बाळगली होती.

तसेच कायद्याच्या अभ्यासाबरोबर त्यांना नृत्याची देखील मोठी आवड होती. त्यातून त्यांनी अनेक राज्यस्तरीय बक्षिसे देखील मिळवली आहेत. या दोन्ही मुलाच्या यशात त्यांचे वडील महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याचे अध्यक्ष जी. के थोरात यांचा मोठा वाटा आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी खुटबाव, यवत, उरुळी कांचन, हडपसर अशा अनेक ठिकाणी आपले कुटुंब अनेक वेळा स्थलांतरित केले. स्नेहाची आई संगीता थोरात या B.A.B.ED असताना देखील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपल्या शिक्षकी पेशाकडे त्यांनी पाठ फिरवली. यांच्या दोन्हीं मुलांनी देखील देश व राज्यातील समाज सेवेचा वारसा जपला आहे.

आई वडिलांचे मार्गदर्शन तसेच अथक परिश्रम व मेहनत अन् चिकाटीच्या जोरावर थोरात कुटुंबियात तसेच दौंड तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल पंचक्रोशीतील सर्वच क्षेत्रातील मित्र परीवाराकडून जी. के थोरात यांच्या दोन्हीं मुलांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

आई वडिलांचे प्रोत्साहन तसेच बंधू अनिकेतच्या मार्गदर्शन यामुळे सर्व काही शक्य झाले. तसेच स्वतः मध्ये इच्छा, जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर आत्मविश्वासाने कुठलीही गोष्ट शक्य होते. आई वडिलांनी दिलेली प्रेरणा यामुळे आम्ही यशस्वी झालो. ईतर मुलांनी देखील जिद्द ठेवावी, प्रयत्न करावे यश दूर नसते, हे आमचेच एक उदाहरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments