Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजयशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती, संयम, परिश्रम, श्रद्धा सबुरी व गुरु या पंचसुत्रीचा वापर...

यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती, संयम, परिश्रम, श्रद्धा सबुरी व गुरु या पंचसुत्रीचा वापर करावाः डॉ. केतन पाटील

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) : यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती, संयम, परिश्रम, श्रद्धा सबुरी व गुरु या पंचसुत्रीचा वापर करावा व पर्यावरण संवर्धनासाठी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमसारख्या या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान आयपीएस अधिकारी डॉ. केतन पाटील यांनी केले.

युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे अध्यक्ष विक्रम गायकवाड व मित्र परिवारातर्फे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कुमशेत (धारे राव मंदिर) येथे संस्थेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता. ०५) करण्यात आले होते. ५०० झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आयएएस अधिकारी शुभम थिटे विशेष उपस्थित होते.

वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम महाराष्ट्र वन विभागाचे चीफ काँजरव्हेटिव्ह अधिकारी गजेंद्र हिरे, कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यचे मुख्य अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या सहकार्याने झाला. यावेळी उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉ समीर ननावरे, डॉ कल्पेश वाणी, डॉ सोनल भालेराव, डॉ चेतन पवार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अॅड देशमुख महाविद्यालय राजूर, सूर्यदत्ता इन्स्टिटयूटचे विद्यार्थी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, तापमानात वाढ, दुर्मिळ वनस्पतीचा ऱ्हास आदि समस्यांना सामोरे जात आहोत. आपले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन आपण या समस्ये विरोधात लढले पाहिजे. यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्रीच्या कुशी मध्ये कळसुबाई च्या पायथ्याशी अहमदनगर जिल्ह्यातील कुमशेत (धारे राव मंदिर) येथे संस्थेतर्फे यावर्षी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कुमशेत धारेराव मंदिर येथे वृक्षारोपण कार्यक्रम युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम ही सामाजिक संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहे. या कार्यक्रमासाठी कुमशेत गावचे सरपंच अस्वले, सदाशिव कल्याणकर, अलीम शेख, पियुष सिरसाट, मानस घाडगे, प्रियांका मदने, चांदू सूर्यवंशी, लिबनी मनालील, दीपक सिंग, आदी उपस्थित होते.

दरम्यान, युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम तर्फे युपीएससी व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांसाठी मोफत मार्गदर्शन व शिष्यवृत्ती दिली जाते. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबीर आदि उपक्रम संस्थे मार्फत केले जातात. या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड यांनी केले.

या वर्षी संस्थेतील ४ विद्यार्थी यूपीएससी, 5 विद्यार्थी एमपीएससी व २ विद्यार्थी पीएसआय झाले आहेत. यातील शुभम थिटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments