इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे): थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व टिळेकरवाडी येथील रहिवासी भीमराव यशवंत टिळेकर (वय- 73) यांचे आज शुक्रवारी (ता. 11) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव टिळेकर हे सकाळी ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले होते. शेतात जात असताना ट्रॅक्टरवरील त्यांचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर त्या ठिकाणी पलटी झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भवरापूरचे पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर यांचे ते वडील होत.
दरम्यान, टिळेकरवाडी येथील श्री दत्त सेवा ट्रस्टची स्थापना करण्यात भीमराव टिळेकर यांचा मोठा वाटा होता. तसेच त्यांनी काही दिवस ट्रस्टचे अध्यक्षपदही भूषवले होते. भीमराव टिळेकर यांच्या निधनाने उरुळी कांचन, टिळेकरवाडीसह भवरापूर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास टिळेकरवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.