इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
यवतः जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा हा आज सायंकाळी यवत येथे मुक्कामी येत असून पालखी सोहळा मुक्कामी असलेल्या श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या पुलाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातील लाखो भाविक हे आषाढी वारी निमित्त विठूरायाच्या भेटीसाठी निघाले असून यापैकी जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा हा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असून हा पालखी सोहळा आज दि.२३ रोजी यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे मुक्कामी येणार आहे. मंदिराशेजारी असलेल्या ओढ्याच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. साचलेला कचरा उचलला जात नसल्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे, कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे वारी साठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असून दुसरीकडे टोल प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे.
मंदिराशेजारी असलेल्या याच पुलावरून पालखी सोहळा गावात प्रवेश करणार आहे. पालखीच्या निमित्ताने लाखो भाविक श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात परंतु मंदिराच्या हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे डासांची संख्याही अधिक प्रमाणात आहे. सायंकाळी व रात्री परिसरात दुर्गंधी पसरली जात असून टोल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी टोल प्रशासनाने तत्काळ या ठिकाणची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.