इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
यवत (पुणे): दौंड तालुक्यातील यवत स्टेशन परिसरातील निळकंठेश्वरमंदिराजवळ शेतात जाणाऱ्या रस्त्यावर रात्री 10.45 च्या सुमारास शशिकांत चव्हाण यांच्या घरात घुसून तीन अज्ञात चड्डी बनियन घातलेल्या व्यक्तींनी दगड, काठ्यांनी कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यामध्ये घरातील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. तर या मारहाणीत अविनाश शशिकांत चव्हाण (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करणे सुरु आहे. घटनास्थळी यवत पोलिसांचे पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)