इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
यवत (पुणे): पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी कुणाल लक्ष्मण दोरगे (वय २७) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यवत येथील महालक्ष्मी मंदिराकडे २५ जानेवारी रोजी एक महिला आपल्या दोन मुलांसह रस्त्याशेजारी निवाऱ्यासाठी थांबली असताना रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती महिलेबरोबर असलेल्या ४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करत असल्याचे महिलेच्या निदर्शनास आले.
यावेळी महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हा यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे, परिसरातील सी.सी.टि.व्ही तपासणी करत कुणाल लक्ष्मण दोरगे यास अटक करण्यात आली असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे करत आहेत.