इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
यवत : एसी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला यवत येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल साळुंखे मिसळ समोर भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कंटेनर मधील एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पुणे महामार्गावरून चेन्नई येथून एसी भरलेला कंटेनर नंबर एच. आर 38 ए. डी 6426 हा भिवंडीकडे निघाला होता. त्यावेळी यवत येथील हॉटेल साळुंखे मिसळ परिसरात कंटेनरला अचानक भीषण आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी चालकाने क्लीनरला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झोपेत असल्याने उठला नाही. कंटेनर चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र क्लीनरला बाहेर पडता न आल्याने त्याचा जळून मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच आजुबाजूचे अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु भीषण आग असल्याने तोपर्यंत कंटेनरसह आतील क्लीनर व ए.सी असा मुद्देमाल जळून खाक झाला.