इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड (पुणे): दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वतीने दौंडउपविभागातील यवत, दौंड व उरूळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने संयुक्तीक तक्रार निवारण दिनाचे आयोजन १ जानेवारी रोजी यवत येथील समृध्दी मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते ५ या वेळेत यवत, दौंड व उरुळी कांचन या पोलीस स्टेशनच्या वतीने तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस हे उपस्थित होते. या तक्रार निवारण दिनाच्या निमित्ताने यवत, दौंड व उरूळी कांचन पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार यंशा तिन्ही पोलिस स्टेशन हद्दीतील तक्रारी अर्जदार, गैरअर्जदार व नागरिक उपस्थित होते.
यावेळी तक्रार निवारण दिना दरम्यान यवत पोलीस स्टेशनचे ११२, दौंड पोलीस स्टेशनचे ९३ व उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे १६ असे दौंड पोलीस उपविभागातील एकुण २२१ तक्रारी बाबत वरिष्ठ पातळीवरील व स्थानिक स्तरावरील नागरीकांच्या तक्रारी अर्जाचे अनुषंगाने तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यात चर्चा घडवुन आणुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून तक्रारींचे निरसन करण्यात आले असल्याची माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.