Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजयवत परिसरात अवकाळी पावसाची हजेरी; कडक उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा

यवत परिसरात अवकाळी पावसाची हजेरी; कडक उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवतः दिवसभराच्या ढगाळ वतावरणानंतर यवत परिसरात अवकाळी पावसाने अखेर हजेरी लावली असून

या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या यवतकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज सकाळपासूनच यवत, कासुर्डी, वाखारी, दहिटणे आदि परिसरात ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर रात्री 9 वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. एकीकडे नागरिक उन्हाच्या झळ्यांनी हैराण झाले असताना यवत परिसरात मात्र पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, पावसामुळे वारा सुरू झाल्याबरोबरच यवत गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्याने परिसरात आल्हादायक वातावरण निर्माण झाले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments