Thursday, November 7, 2024
Homeक्राईम न्यूजयंदा म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी संगणक प्रणालीमध्ये बदल

यंदा म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी संगणक प्रणालीमध्ये बदल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : यंदा म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी वापरण्यात येणाऱ्या संगणक प्रणालीमध्ये काही बदल करून अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज करताना अर्जदारासह त्यांच्या पती अथवा पत्नीचे आधारकार्ड व पॅनकार्ड हे डिजी लॉकर वरूनच प्राप्त करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रहिवास प्रमाणपत्र हे २०१८ नंतरचेच असणे आवश्यक असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ऑक्टोबर २०२४ च्या सोडतीपासून हे बदल करण्यात आले आहे. डीजी लॉकरवर नोंदणी केली नसेल, तर अर्जदाराला नोंदणी करावी लागणार आहे. तसेच अर्जदाराला त्यांच्या वैवाहिक स्थितीची माहिती द्यावी लागणार आहे. अर्जदार घटस्फोटीत असल्यास त्यांना तसे आदेश अपलोड करावे लागतील, अर्जदार विधवा, विधूर असल्यास पती-पत्नीचा मृत्यू दाखला अपलोड करावा लागणार आहे. यासह अर्जदाराच्या पती-पत्नीच्या उत्पन्नाबद्दलची माहिती सुद्धा द्यावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments