Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजम्हाळुंगे परिसरात वृद्ध महिलेला लुटणाऱ्या तरुणीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

म्हाळुंगे परिसरात वृद्ध महिलेला लुटणाऱ्या तरुणीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्याच्या म्हाळुंगे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. म्हाळुंगे परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेवर लक्ष ठेवून, तिच्या घरात घुसून एका तरूणीने वृद्ध महिलेचा गळा ओढणीने दाबत, तिला मारहाण केली. आणि तिच्याकडे असलेले सोन्याचे दागिने व पैसे लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या तरूणीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. या प्रकरणी बावधन पोलिसांनी तिला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, म्हाळुंगे परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेवर लक्ष ठेवून, तिच्या घरात घुसून एका तरूणीने वृद्ध महिलेचा गळा ओढणीने दाबत, तिला मारहाण केली. आणि तिच्याकडे असलेले सोन्याचे दागिने व पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वृद्ध महिलेने प्रसंगावधान दाखवत गॅलरीत जाऊन बचावासाठी आरडाओरड केली. त्यानंतर शेजऱ्यांनी चोरट्या तरुणीला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजराबाई कोळेकर असे त्या वृद्ध महिलेचे नाव असून ही घटना समाज माध्यमावरही व्हायरल झाली होती. ही तरुणी वयोवृध्द महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर गेली. त्यांनंतर वयोवृद्ध महिलने सदनिकेचं दार उघडल्यावर, तिच्यापाठोपाठ लगेचच तरूणीदेखील आत घुसली आणि तिने दार बंद केलं. त्यानंतर त्या आरोपी तरूणीने महिलेचा गळा दाबत हल्ला केला. वृद्ध महिलेच्या पदराने तिचा गळा घट्ट आवळला.

नंतर त्या तरूणीने महिलेचा गळा आणखी आवळून सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. शेवटी अखेर त्या महिलेने तिला विनवलं, मी तुला दागिने, पैसे सगळं देते, पण मला सोड, माझा जीव घेऊ नको, अशी विनंती केली. त्यानंतर तीने जवळच्या खिडकीतून मला वाचवा असं म्हणत आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजीच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांनी आरोपी तरूणीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकरणाचा बावधन पोलिस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments