इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लातूर: लातूर जिल्ह्यात जनावरे चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकातील काही भागात तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच म्हशी चोरल्याची माहिती समोर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर त्याला अटक करण्यात आली. अशोक असे चोरट्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर रेल्वे स्टेशन भागात तो दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत चोरट्याला पकडले. मात्र, पोलीस आल्याचा सुगावा लागताच चोरटा त्या भागातील मोठ्या गटारीत जाऊन बसला. संपूर्ण शरीर गटाराच्या आत ठेवत चेहरा फक्त बाहेर ठेवून लपून बसला होता. मात्र पोलिसांनी त्याला गटारातून बाहेर काढलं.
त्यानंतर, अशोकला अटक करून पोलिसांनी त्याला कार वॉशिंग सेंटरवर आणले. तेथे त्याला पाण्याने धुण्यात आले. त्यानंतर त्याला पोलीस्टेशनला नेण्यात आले. मात्र, हा सगळा प्रकार रेल्वे स्टेशन भागात वर्दळीच्या ठिकाणी घडल्यामुळे बघ्याची मोठी गर्दी येथे जमली होती.
आरोपी, अशोक याला अटक करून त्याने कुठे कुठे म्हशी चोरल्या आहेत याची चौकशी करण्यात येत आहे. उदगीर पोलीस तपास करत आहेत.