Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजम्हशींनी जादा दूध देण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा गैरवापर; गोठा चालकाची येरवडा मध्यवर्ती...

म्हशींनी जादा दूध देण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा गैरवापर; गोठा चालकाची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दौंड : दौंड परिसरात म्हशींना पान्हवण्यासाठी आणि त्यांनी जादा दूध द्यावे याकरिता ऑक्सिटोसिन औषधाचे इंजेक्शन देऊन, इंजेक्शनचा गैरवापर करणाऱ्या गोठा चालकाची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दिनेश दत्तात्रेय हिरणावळे (वय – 36, रा. हनुमान मंदिराजवळ, वडार गल्ली, दौंड) असे येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी शनिवारी (ता. 08) दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 फेब्रुवारी रोजी पानसरे वस्ती येथील दिनेश हिरणावळे हे त्यांच्या गोठ्यातील म्हशींना दूध वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन औषधाचे इंजेक्शन देऊन या इंजेक्शनचा गैरवापर करत असल्याची माहिती फिर्यादी औषध निरीक्षक सावंत यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून 8 फेब्रुवारी रोजी आपले सहकारी औषध निरीक्षक सचिन बुगड, अन्नसुरक्षा अधिकारी बारवकर तसेच दौंड पोलिसांचे पथक यांनासोबत घेत पानसरे वस्ती येथील गोठ्यावर छापा मारला.

गोठ्याचे मालक दिनेश हिरणावळे तेथे उपस्थित होते. गोठ्याची तपासणी केली असता त्या ठिकाणी हिरणावळे यांच्या मालकीच्या 40 म्हशी आढळून आल्या. तसेच 100 मिली मापाच्या 3 लेबल नसलेल्या वापरलेल्या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्या. त्याचप्रमाणे एक 20 मिलि ट्रान्सपरंट लिक्विड असलेली औषधाची बाटली व चार वापरलेले प्लास्टिकचे सीरींज तसेच एक निडल सापडली. सदर मिळालेल्या बाटल्या, औषधांबबाबत दिनेश हिरणावळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचे औषध ऑक्सिटोसीन असल्या सांगितले.

सदरच्या आषधाचा वापर हा गाठ्याताल म्हशाना इंजेक्शनद्वारे देऊन त्यांच्याकडून जास्त प्रमाणात दुधाचे उत्पादन करून लोकांना विक्री करत असल्याचे सुद्धा त्याने सांगितले. सदरचे औषध (110 बाटल्या, 40रु. प्रति) त्याने आठ दिवसांपूर्वी समीर नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याचे कबूल केले. दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांना ऑक्सिटॉसिन इंजेक्शन देणाऱ्या गोठा चालकाची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. म्हशींना पान्हवण्यासाठी आणि त्यांनी जादा दूध द्यावे, याकरिता ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देत होता.

दरम्यान, या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होते. हिरणावळे याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. ऑक्सिटॉसिन इंजेक्शनचा पुरवठा करणारा समीर नावाच्या व्यक्तीचा नेमका ठावठिकाणा दौंड पोलिस शोधत आहेत.

काय आहे ऑक्सिटोसिन ?

ऑक्सिटोसिन हे मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीत तयार होणारे आणि तेथेच साठवले जाणारे हार्मोन आहे. महिलांमध्ये प्रसूती वेदना वाढवून गर्भपिशवीचे तोंड उघडण्यासाठी स्टिम्युलेटर म्हणून या हार्मोनचा वापर डॉक्टर करतात. तसेच दूध येण्यासाठी उत्प्रेरक म्हणूनही ते काम करते.

कठोर शिक्षेची तरतूद

ऑक्सिटोसिनची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री करणा-या औषध विक्रेत्याचा परवाना रद्द होऊ शकतो. विक्रेत्यास 5 वर्षे कारावास व आर्थिक दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. ऑक्सिटोसिनचा वापर करणा-या पशुपालकांना 1 ते 3 वर्षे कारावा आर्थिक दंडाची तरतूद आहे; पण त्यासाठी आवश्यकता आहे जागरूक नागरिकांनी तक्रार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments