Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमौजमजेसाठी चोरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकाकडून 10 मोटार सायकल व एक...

मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकाकडून 10 मोटार सायकल व एक ट्रॅक्टर जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वारजे – फक्त मौजमजेसाठी तब्बल दहा मोटारसायकली आणि एक ट्रॅक्टर असा पाच सव्वा पाच लाख रुपयांची वाहने चोरणाऱ्या विधी संघर्षित बालकाला वारजे माळवाडी पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

वारजे माळवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संभाजी दराडे हे गुन्हे प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना त्यांना कॅनॉल रस्त्यावरील खान वस्ती जवळ एक लाल रंगाच्या मोटार सायकल वरती एक संशयित मुलगा थांबलेला दिसून आला. त्यांनी त्याची चौकशी केली असता संशयित मुलगा हा विधी संघर्षक बालक असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच त्याच्या ताब्यातील मिळून आलेली दुचाकी ही चोरीचे असल्याचे दिसून आले. त्याच्या पालकासमक्ष त्याचे अधिक विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वी आजूबाजूच्या परिसरातून अजून काही गाड्या चोरी केल्याचे सांगितले. तसेच सदरच्या गाड्या चोरी का केल्या याबाबत पोलिसांनी विचारपूस केले असता त्याने सदरच्या गाड्या ह्या फक्त मौजमजेसाठी चोरी केल्या असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यांचा पंचनामा करून त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या एकूण दहा मोटारसायकली व एक कॅप्टन कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. अशी एकूण 11 वाहने या बालकाने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव टिळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, प्रदीप शेलार, भुजंग इंगळे, मनोज पवार, विजय बुरुख, बंटी मोरे श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, संभाजी दराडे, अजय कामते, सत्यजित लोंढे यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments