Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूज"मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत..." राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

“मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत…” राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पक्षाचे शीर्षस्थ नेते राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी भाजप सरकारच्या काळात जनतेचा पैसा कसा लुटला जातोय, याबाबत गंभीर आरोप केले.

जातनिहाय जनगणनेवरुन राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी आधी सांगायचे मी ओबीसी आहे. परंतु जेव्हापासून आम्ही जातनिहाय जनगणनेचा विषय काढला तेव्हापासून मोदी स्वतःच्या ओबीसी असण्यावर बोलत नाहीत. मोदी आता सांगतात फक्त दोन जाती आहेत.. गरीब आणि श्रीमंत. मोदींनी फक्त २२ लोकांना फायदा पोहचवला आहे. रेल्वेचे खाजगीकरण करण्यासाठी बुलेट ट्रेन हा बहाना आहे, अग्निवीरला ना पेंशन मिळणार ना शहीदाचा दर्जा मिळणार, अग्निवीर ही योजना आम्ही संपवू असं म्हणत राहुल गांधींनी जीएसटीमध्ये बदल घडवून आणू, असं आश्वासन दिलं.

राहुल गांधींच्या भाषणातील मुद्दे…

• मोदींनी २२ लोकांना १६ लाख कोटी रुपये दिले

• शेतकऱ्यांचे २४ वर्षे कर्ज माफ करत गेले तर एवढे पैसे पुरतील

• ९० अधिकारी देशाचे बजेट वाटतात, ७ अधिकारी केंद्रात निर्णय घेतात.

• हीच परीस्थिती महाराष्ट्रात आणि युपी सरकारमध्ये आहे

• आम्ही जातनिहाय जनगणना करु.. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात कोणत्या जातीचे किती लोक आहेत याची माहीती जाहीर करु

जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा

मोदी सरकाराचा जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा आहे. २२ लोकांना मोदींनी जेवढा फायदा दिला तेवढा फायदा आम्ही शेतकऱ्यांचा करू, असं म्हणत राहुल गांधींनी भाजप सरकारवर निशाणा साधला. गरीब महिलांना आम्ही दरवर्षी आम्ही एक लाख रुपये देऊ, आदानीला लोखो करोड दिले तर ते बिघडत नाही पण गरीबंना एक लाख दिले की त्यांना त्रास होणार.. दारीद्रय रेषेच्या वर येईपर्यंत या कुटुंबांना/महिलांना एक लाख रुपये देत राहणार, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींची आश्वासनं…

• आशा वर्कसचे मानधन दुप्पट करणार

• मनरेगात ४०० रुपये रोज देणार

• शेतकऱ्यांना योग्य दर देवून कर्ज माफ करणार

• कर्ज माफीसाठी आम्ही कमिशन नेमणार

• ते २ टक्के लोकांचे सरकार चालवत आहेत, आम्ही ९८ टक्के लोकांचे सरकार चालवू

• करोनात लस पुरवणाऱ्या कंपनीने नरेंद्र मोदींच्या पक्षाला डोनेशन दिले

• युवकांना नोकरीची गॅरटी, कायदेशीर अधिकार देणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments