इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील स्वारगेट बस डेपोत एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी (२५ फेब्रुवारी) घडली होती. त्यानंतर आरोपी आरोपी फरार आहे. मात्र आता पोलिसांनी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७वर्षे) हा फरार असल्याने याची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
आरोपी सापडत नसल्याने..
अधिक माहिती अशी की, स्वारगेट डेपोत आपल्या गावी चाललेल्या २६ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करून आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७वर्षे) रा. गुनाट, ता. शिरूर, जि. पुणे) हा फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हेगारास शोधण्यासाठी आठ पोलिस पथकं रवाना केली आहेत. मात्र या घटनेला होऊन तीन दिवस होत आहेत तरी अजून आरोपी सापडत नसल्याने अखेर स्वारगेट पोलिसांनी आरोपीची माहिती देणारास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्याचे घोषित केले आहे.
आरोपीची माहिती देणाराचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. या संबंधित स्वारगेट पोलिसांनी माहिती पत्रक जारी केले आहे.