इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. शरद पवार यांचे धाकटे बंधू उद्योगपती प्रतापवराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे पुण्यात निधन झाले आहे. एक्स या माध्यमावर पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रतापराव पवार हे सख्खे बंधू आहेत. भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती पवार या मागील जवळपास दीड वर्षांपासून आजारी होत्या. भारती पवार यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्टः
खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट लिहिली, अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील. काकी, भावपूर्ण श्रद्धांजली.