Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी...! लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मोठी बातमी…! लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे, मावळ, शिरुर, बारामती या मतदारसंघात 7 मे आणि 13 मे रोजी लोकसभेसाठी मतदान पार पडले. या मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी 4 जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिवस सर्व मद्यालये, मद्य विक्री दुकाने आणि इतर मद्यविषयक आस्थापना बंद राहणार असून मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमित केले आहेत.

पुणे जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी तर मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान पार पडले. मतदानाच्या 48 तास अगोदर सर्व मद्य विक्रीच्या, ताडी विक्रीच्या व इतर संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मतमोजणीच्या दिवशी (दि. 4) देखील संपूर्ण दिवसासाठी हे आदेश लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले होते.

त्यानुसार उद्या पुणे शहरात मद्यविक्री बंद असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949 व त्याअंतर्गत लोकप्रतिनिधीत्व अधिनियमन 1951 अंतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

‘या’ ठिकाणी होणार मतमोजणी

बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघ भारतीय अन्न महामंडळ, कोरेगाव पार्क शिरुर लोकसभा मतदार संघ महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळ, रांजणगाव, ता. शिरुर मावळ लोकसभा मतदार संघ वेटलिफ्टिंग हॉल, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments