इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनीएका पॉडकॉस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत होत्या. अश्यातच आता त्यांचं वक्तव्य असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे आंबेडकर अनुयायी देखील सोलापूरकर यांच्या वक्तव्याबद्दल संतप्त झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे, पोलिसांनी राहुल सोलापूकर यांच्या पुण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी, आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले..
“राहुल सोलापूरकरांचे दोन्ही व्हिडिओ पोलिसांनी तपासले आहेत. या व्हिडिओमध्ये अजून तरी काही गुन्ह्या घडला असल्याचे दिसून येत नाही. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त केलेला आहे. आवश्यकता भासल्यास राहुल सोलापूरकर यांना चौकशीसाठी बोलवून घेऊ”, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे म्हणाले की “अजून तरी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यांच्या व्यक्तव्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळलं तर गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र आत्तापर्यंत तपासलेल्या व्हिडिओ मधून गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही” असे आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटले आहे.