इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
राजस्थानः राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पाली येथून हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. पाली येथून हेलिकॉप्टरने उड्डान घेत असताना ही घटना घडली आहे. त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना मागच्या बाजूस स्फोट झाला. स्फोट झाल्याचे लक्षात आल्यानंतर पायलटने प्रसंगावधान बाळगत तात्काळ हेलिकॉप्टरचे सुरक्षित लैंडिंग केले. त्यामुळे सुदैवाने या अपघातामध्ये हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले.
या आपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे हे राजस्थानवरून पाली येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटपून ते जयपूरला निघाले होते. त्याचवेळी अपघाताची ही घटना घडली. या घटनेमुळे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सुरक्षेतील मोठी चूक समोर आली आहे.