Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी ! माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात;...

मोठी बातमी ! माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नागपूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अनेक वर्षांपूर्वीच्या सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अनेक वॉरंट काढण्यात आले होते. तरी ते न्यायालयात हजर होत नव्हते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते.

हर्षवर्धन पाटील हे कन्नड विधानसभेचे माजी आमदार असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत. नुकतीच झालेली विधानसभा निवडणुकीही त्यांनी लढवली होती. मात्र, त्यांच्या पदरी पराभव आला. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव हे त्यांची पत्नी संजना जाधव यांच्याकडूनच पराभूत झाले आहेत.

हर्षवर्धन जाधव काल (दि.) नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशावरुन त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना तुरुंगात नेण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे पोलिसांकडून कायदेशीर सोपस्कार पार करत त्यांना रीतसर अटक करुन तुरुंगात पाठवण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र, हर्षवर्धन जाधव यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना पुढील 24 तास पोलिसांकडून अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. हर्षवर्धन जाधव यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवले आहे.

नागपुरात 353 अतंर्गत गुन्हा..

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 मध्ये नागपूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव जात होते. मात्र, त्यावेळी, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून त्यांना नकार दिल्यानंतर पोलीस आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाला होता. या घटनेत त्यांच्यावर 353 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्यात आज त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments