Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी..! महानगरपालिकेचे पाणी पिण्यास अयोग्य; 'एनआयव्ही'च्या अहवालातून स्पष्ट

मोठी बातमी..! महानगरपालिकेचे पाणी पिण्यास अयोग्य; ‘एनआयव्ही’च्या अहवालातून स्पष्ट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः जीबीएस बाबत मोठी बातमी समोर आली आहे. शहराच्या सिंहगड रस्ता भागात जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महानगरपालिकेने पाणी तपासण्यास सुरुवात केली होती. तपासणीसाठी पाठवलेल्या पाण्याच्या अहवालातून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासह खासगी टँकर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस प्रकल्पांचे पाणी देखील पिण्यास योग्य नसल्याचे समोर आले आहे. आता सिंहगड रस्ता भागातील ७० पाणी नमुन्यांमध्ये जिवाणु आणि विषाणू आढळले आहेत.

अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्ता भागात जीबीएसचा उद्रेक झाला होता. त्यानंतर महानगरपालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचे एक हजार पेक्षा जास्त नमुने पाणीपुरवठा विभागाने शहरातील पर्वती जलकेंद्रात तपासले आहेत. त्यानंतर यामधील १८ नमुने पर्वती जलकेंद्रात तपासण्यात आले होते. त्या मधील १५ नमुने पिण्यास अयोग्य असल्याचा अहवालातून समोर आले आहे. या बरोबरच या भागातील ३६ आरओ केंद्रांचे पाणी नमुने तपासले असता त्यातील २३ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे उघड झाले आहे.

नमुन्यात कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आढळला

दरम्यान सिंहगड भागातील २०६ पाणी नमुने एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आलेल्या अहवालात यापैकी ६ नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणू आढळून आला आहे. तसेच एका नमुन्यात कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आढळल्याचे समोर आले आहे. हा नमुना किरकिटवाडीतील मोरया सोसायटीतील नळाच्या पाण्याचा होता. तसेच सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने सिंहगड रस्ता भागातील ४३ पाणी नमुने तपासले असता त्यातील १३ नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत. यामधील ६ नमुन्यांमध्ये ई-कोलाय व ९ नमुन्यांमध्ये कॉलिफॉर्म जीवाणू आढळून आले आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments