इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबदनामी प्रकरणी आता ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. एकतर्फी बातम्या दिल्याचा त्यांच्यावर आरोप मंत्री गोरे यांनी करत मानहाणीचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार तुषार खरात यांना अटक केल्यानंतर रात्री उशिरा वडूजयेथील रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (10 मार्च) वडूज येथील न्यायालयासमोर पत्रकार तुषार खरात यांना हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाने आदेश देऊनही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या एकतर्फी बातम्या दाखवून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. तुषार खरात यांच्यावर म्हसवड, बीड, सोलापूर, वडूज, दहिवडी, येथील पोलीस ठाण्यात विनयभंग, खंडणी, बदनामी करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.