इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्यागोदरच गोपनीय माहिती उघड होत असल्याने नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री मंडळ बैठकीतील गोपनीय माहिती उघड होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे कोणतीही गोपनीय माहिती बाहेर फुटल्यास सर्व मंत्र्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
अधिक माहिती अशी की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच बैठकीतील संपूर्ण माहिती प्रसारमध्यासमांना मिळत आहे. वृत्तवाहिन्यांवर दिसणाऱ्या माहिती मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेतले जाणार आहेत? याची तपशीलवर माहिती अगोदरच वृत्त वाहिन्यांना मिळाले. त्यामुळे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत काय घडणार, याची माहिती सर्वांनाच असते. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर निर्णय घेत मंत्र्यांना तंबी दिली आहे.
मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली असते त्यामुळे..
मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय किंवा अजेंड्याची माहिती बैठकी पूर्वीच बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. माहिती उघड झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिला आहे. ते म्हणाले बैठकीआधीच माहिती बाहेर फोडण्याची पद्धत चुकीची आहे. मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. त्यामुळे कार्यक्रमपत्रिका गुप्त असली पाहिजे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमध्ये काही लपवण्यासारखे नसले तरी देखील काही रुढ संकेत असतात. त्याचे उल्लंघन व्हायला नको. त्यामुळे प्रसारमाध्यमांनीही टीआरपी मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच निर्णयांची माहिती प्रसारीत करू नये. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.