इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरात झालेल्या भाजपच्या संघटन पर्वकार्यशाळेत बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपचे सक्रिय सदस्य आणि सक्रिय सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांनाच इथूनपुढे संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळणार आहे. कणी कोणाच्याही जवळचा असला तरी, सदस्य नसल्यास संधी मिळणार नाही, अशी तंबीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी भाजप कार्यकर्त्यांना दिली आहे.
पुण्यात भाजप च्या वतीने पुणे विभागातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी संघटन पूर्व कार्यशाळ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, विक्रांत पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या वेळी बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने १ कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट ठरवले आहे. त्यापैकी १ कोटी १६ लाख प्राथमिक नोंदणी पूर्ण झाली आहे. हे उद्दीष्ट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीपर्यंत साध्य करायचे असून त्यासाठी येत्या १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा ‘घर चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे.
प्राथमिक सदस्य नोंदणी ही नेत्यांसाठी नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार असलेल्या कार्यकर्त्यांसाठी आहे. त्यामुळे निवडमुकीत मतदान करणाऱ्या प्रत्येकाला पक्षाशी जोडून घेणे आणि भाजपचा सक्रिय सदस्य करून घेणे गरजेचे आहे. या पुढे केवळ पक्षाच्या सकिय सदस्याला आणि सक्रिय सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांनाच संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळेल. असे ते म्हणाले.