इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कोल्हापूरः छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर तुरुंगात होता. आज (11 एप्रिल) अखेर त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. न्यायालयाने कोरटकरला 2 दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आज प्रशांत कोरटकर कळंबा तुरूंगाबाहेर आला आहे. नागपूरपर्यंत सुरक्षा देण्याची विनंती प्रशांत कोरटकरने पोलिसांकडे केली होती. मात्र, कोल्हापूर पोलीस त्याला केवळ जिल्ह्याच्या सीमेपर्यन्तच सुरक्षा देणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. कोरटकर छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर निर्णय देताना कोल्हापूर न्यायालयाने अखेर काही अटी-शर्तीसह जामिन मंजूर केला आहे.