इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून गेला असल्याची माहिती समोर येत आहे. संतोष सचिन साठे असे रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी साठे याच्याविरोधात कराड पोलीस स्थानकामध्ये कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात साठे याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. पोलिसांचा देखदेखीखाली उपचार घेत असलेला साठे सकाळी रुग्णालयातून पळाला आहे. याप्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा पुणे शहरातील कायदा सुव्यस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यापूर्वी 2023 मध्ये ड्रग्स माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयामधून पळून गेला होता. तेव्हा देखील पुणे पोलिस आणि रुग्णालयाच्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले होते. तसेच या प्रकरणी कारवाईसुद्धा झाली होती. त्यानंतरही ससूनमधून आरोपी पळून जाण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार घेत असलेला आरोपी पळाला आहे.