Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी ! पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या स्कूल व्हॅनची तोडफोड

मोठी बातमी ! पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या स्कूल व्हॅनची तोडफोड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे शहरातील वानवडी भागात एका नामांकित शाळेतील ६ वर्षांच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून ४५ वर्षीय आरोपीस पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात उभी असलेली आणि आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्कूल व्हॅन दगडाने फोडली.

हे प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. व्हॅन फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments