Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी....! पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला जामीन मंजूर; परंतु,...

मोठी बातमी….! पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला जामीन मंजूर; परंतु, सुटका नाही

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कल्याणी नगर भागातील अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने तपास यंत्रणांना तपासासाठी सहकार्य करावं लागणार आहे, अशा अटीशर्तीवर अग्रवाल याला जामीन मंजूर केला आहे. याच अटीच्या आधारावर विशाल अग्रवालला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

विशाल अग्रवाल याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत, या तीन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, इतर दोन गुन्ह्यांत तो न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. त्यामुळे विशाल अग्रवाल याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे.

विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून दोघांचा जीव घेतला होता. मुलगा अल्पवयीन आहे आणि दारूच्या नशेत होता. याप्रकरणी विशाल अग्रवालवरती येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अग्रवालला जामीन देण्यात आला आहे.

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रक्त चाचणी फेरफार प्रकरणात आज विशाल अग्रवाल, त्याची पत्नी शिवाणी अग्रवाल आणि अश्पाक मकानदार यांची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं. पुणे पोलिसांनी यावेळी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली. रक्त चाचणीत फेरफार करून पुरावा नष्ट करण्यासाठी एक बैठक झाली.

त्या बैठकीला अग्रवाल दाम्पत्य आणि अश्पाक मकानदार यांच्यात बैठक झाली. ती बैठक कुठे झाली आणि त्या बैठकीतून अजय तावरेला संपर्क झाला का? याचा तपास पुणे पोलिसांना करायचा आहे. त्यामुळे आम्हाला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद पुणे पोलिसांकडून आज कोर्टात करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments