Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल...

मोठी बातमी : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि त्याचे वडिल विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली आहे. आता हे दोघेही 31 मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये असणार आहेत. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायलाही देखील अटक केली आहे. त्यांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी कोर्टाने डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

दरम्यान पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना आज (दि. 28) न्यायालयात हजर करण्यात आले होते. कार चालकाचे अपहरण, मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा आणि तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आधी अटकेत होते. त्यानंतर विशाल अग्रवालला याप्रकरणी आज मंगळवारी अटक दाखवण्यात आलेली आहे. कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या दरम्यान सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी देखील झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments