इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला. आता या प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शितल चव्हाण (वय-34) असे फोन करणा-या महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याचा प्लॅन झाला असल्याचा दावा महिला कॉलरने केला आहे. हा धमकीचा फोन येताच मुंबई पोलीसांनी तात्काळ तपास सुरु केला आहे. या महिलेची विचारपूस केल्यानंतर कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असलेल्या महिलेने हा फोन केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.