इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. अशातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्ली येथील सरकारी निवासस्थानावर निवडणूक आयोगाने छापा टाकला असल्याची बातमी मसमोर येत आहे.
कपूथला येथील भगवंत मान यांच्या घरी निवडणूक आयोगाचे पथक दाखल झाले आहे. त्यांनी काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. त्यात मुख्यमंत्री भगवंत मान हे आम आदमी पार्टीचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने टाकलेल्या छाप्यानंतर चर्चाना उधाण आले आहे.