इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने उपचारांआधीच 10 लाख डिपोझीट भरण्यासाठी अडवणूक केल्यामुळे गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला. डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी उपचारांआधी 10 लाख रुपये मागितले असा आरोप भिसे कुटुंबियांकडून करण्यात आला होता. यानंतर सर्वच स्तरावर या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने तपासासाठी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर यामध्ये भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासन दोषी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाची होत असलेली बदनामी, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची होणारी गैरसोय आणि चौकशीला कंटाळून डॉ. घैसास यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. डॉ. घैसास यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
आमदार अमित गोरखे म्हणाले
आमदार अमित गोरखे म्हणाले, “सुरुवातीपासून भिसे कुटुंबाचं म्हणणं होतं की या दुर्दैवी मृत्यूला डॉ. घैसास जबाबदार आहेत. राज्य सरकारने व मंगेशकर कुटुंबाने ज्या उदात्त हेतूने हे रुग्णालय सुरू केलं होतं. त्या चांगल्या हेतूला काळीमा फासण्याचं काम डॉ. घैसास यांनी त्यांच्या कृतीतुन केलं आहे. त्यामुळे आमची अशी मागणी होती की डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करावा. मात्र, आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचा अर्थ असा होतो की तनिषा भिसे यांच्या मृत्यूत कुठेतरी घैसास यांना अपराधीपणा वाटत असावा. त्यांनी त्याच अपराथी भावेतून राजीनामा दिला असावा”.